खुशखबर! पीएफ खात्यातून आता जास्त रक्कम काढता येणार
कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतून पैसे काढण्याच्या कमाल मर्यादेत केंद्र सरकारने वाढ केली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे सदस्य यापुढे एकावेळी एक लाख रुपयांपर्यंत पैसे काढू शकतात. कामगार मंत्री मनसुख मांडविया यांनी ही माहिती दिली. याआधी कमाल मर्यादा पन्नास हजार रुपये होती. त्यात आता आणखी पन्नास हजारांची वाढ करण्यात आली आहे.
मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाला मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाला शंभर दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने बोलताना कामगार मंत्र्यांनी ही माहिती दिली. लग्न आणि वैद्यकीय उपचारांसारख्या खर्चासाठी ईपीएफओचे सदस्य त्यांच्या खात्यातील काही रक्कम काढतात. मात्र, कधी-कधी पैशाची गरज जास्त असते. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे.
केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयावर कर्मचारी खुश आहेत. कारण, दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. खर्च करण्याच्या पद्धती बदलल्या आहेत. त्यामुळे ५० हजार रुपये ही मर्यादा अडचणीची ठरत होती. अशा परिस्थितीत कमाल मर्यादा एक लाख रुपयांपर्यंत वाढवण्याच्या निर्णयाचा अनेकांना फायदा होणार आहे.