ब्रेकिंग! खंडणीखोर शरदया कोळीची गाडी फोडणार
दक्षिण सोलापूरमध्ये काँग्रेस आणि ठाकरे गटात राजकीय वातावरण तापले आहे. ऐन मतदानाच्या दिवशी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, सुशीलकुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांनी अपक्ष धर्मराज काडादी यांना पाठिंबा दिला. त्यामुळे शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. दक्षिण सोलापूरमधून ठाकरेंच्या शिवसेनेने अमर पाटील यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, महाविकास आघाडीचा धर्म न पाळता प्रणिती यांनी काडादी यांना ‘सपोर्ट’ केल्याने शिवसैनिकांनी त्यांच्या फोटोवर चपल्या मारत निषेध केला.
शिवसेनेचे उपनेते शरद कोळी यांनी प्रणिती यांचा एकेरी उल्लेख करत चांगलाच समाचार घेतला आहे. प्रणिती शिंदे गद्दार आहे. तिला लाज, लज्जा नाही. प्रणिती शिंदेची महाविकास आघाडीतून हकालपट्टी करावी, अशी मागणी कोळी यांनी केली आहे.
दरम्यान यावर आता सोलापुरातील काँग्रेसने अत्यंत आक्रमक भूमिका मांडली आहे. सोलापूर युवा काँग्रेसचे अध्यक्ष गणेश डोंगरे यांनी एक व्हिडिओ पोस्ट करत शरद कोळी यांच्यावर झहरी टीका केली आहे. शरद कोळी हा खंडणीखोर आहे. त्याचे दोन नंबरचे धंदे आहेत. वास्तविक उद्धव ठाकरे यांच्यासारख्या सज्जन माणसाने शरद कोळी सारख्या खंडणीखोराला उपनेतेपद देणे ही म्हणजे शिवसेनेची शोकांतिका आहे. अरे, शरदया कोळी तू काय खासदार प्रणिती शिंदे यांची गाडी फोडतो. मी तुझ्या ऑफिस समोर आलो आहे. तुझ्या ऑफिससमोर तुझीच गाडी फोडू, असा इशारा डोंगरे यांनी दिला आहे.