खेळ
वर्ल्ड कपमधून भारत बाहेर, मात्र पहिली विकेट पडली द्रविडची
- T20 World Cup च्या सेमीफायनलमध्ये पराभूत झाल्यानंतर टीम इंडियाची कोचिंग टीम बदलली आहे. आगामी न्यूझीलंड दौऱ्यावर व्हीव्हीएस लक्ष्मण भारतीय संघाचा प्रशिक्षक असेल. राहुल द्रविडच्या नेतृत्वाखालील कोचिंग स्टाफला T20 वर्ल्ड कपनंतर ब्रेक देण्यात आला आहे.
भारताला न्यूझीलंड दौऱ्यावर 3 टी-20 आणि 3 एकदिवसीय मालिका खेळायची आहे. ही मालिका वेलिंग्टनमध्ये १८ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. - या दौऱ्यासाठी कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, सलामीवीर केएल राहुल आणि फिरकीपटू रविचंद्रन अश्विन या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. यासोबतच कोचिंग स्टाफलाही टी-20 वर्ल्ड कपनंतर ब्रेक देण्यात आला आहे.
बीसीसीआयच्या माहितीनुसार, लक्ष्मणच्या नेतृत्वाखालील एनसीए संघ न्यूझीलंडला जाणारा संघ सामील होईल, ज्यात हृषिकेश कानिटकर (फलंदाजी प्रशिक्षक) आणि साईराज बहुले (गोलंदाजी प्रशिक्षक) यांचा समावेश आहे.