एकच नंबर! दोन वर्षाच्या आर्याने सोलापूरकरांची मने जिंकली

Admin
1 Min Read
  • सोलापूर : बाळे येथील ग्राम महसूल सेवक श्री राहुल आप्पासाहेब तोडकरी यांची कन्या कु.आर्या तोडकरी तिचा दुसरा वाढदिवस पूरग्रस्त भागातील पाकणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळे मधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून करण्यात आला. 
  • मागील महिन्यापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी व काही ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे सीना नदीच्या शेजारील भागात असणाऱ्या पाकणी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये तसेच परिसरातील घरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी घुसले असल्याने तेथील नागरिकांचे व विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे..त्यामुळे राहुल तोडकरी व त्यांचा मित्र परिवार यांनी कु. आर्या तोडकरी यांच्या वाढदिवसाला होणारा वायफळ खर्च टाळून पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक व शालेय किटचे वाटप करून तिचा वाढदिवस साजरा केला. 
  • सदर वाढदिवसा प्रसंगी शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केल्याने पूरग्रस्त पाकणी भागातील जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी, शिक्षक वृंद, नागरिक तसेच पालक यांनी तोडकरी कुटुंबाचे व मित्रपरिवार चे आभार व्यक्त केले. 
  •  या वाढदिवसा प्रसंगी प्रभाकर तोडकरी, सुसेन स्वामी, श्रीकांत पाटील,राहुल तोडकरी,स्वप्निल पवार नंदकुमार घोगरे, विकास सर्वगोड, मुख्याध्यापिका कुलकर्णी मॅडम शालेय समितीचे अध्यक्ष भारत शिंदे तसेच शाळेचे शिक्षक, कर्मचारी व पालक उपस्थित होते.
Share This Article