खुशखबर! सोलापुरात रोजगार मेळाव्याचे आयोजन

सोलापूर जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सोलापूर यांच्यामार्फत दिनांक 30 नोव्हेंबर रोजी पंडित दिनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील नोकरी इच्छुक उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने सदर ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती कौशल्य विकास रोजगार व उद्योजकताचे सहाय्यक आयुक्त सचिन जाधव यांनी सांगितले.
या रोजगार मेळाव्यात दहावी, बारावी, ट्रेनी, आयटीआय, वेल्डर, फिटर, डिप्लोमा, ग्रॅज्युएट, स्टाफ नर्स, ऑफिस असिस्टंट, बी.एस.सी, एम.एस. सी, मार्केटिंग, टेलीकॉलर, लिपिक, शिपाई अशा प्रकारच्या 336 पेक्षा जास्त रिक्तपदे 6 उद्योजकांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अधिसुचित केलेली आहेत.
नोकरी इच्छुक उमेदवारांनी सदर संकेतस्थळावर नोंदणी पूर्ण करून शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्त पदांसाठी ऑनलाईन अर्ज करावेत. जेणेकरून त्यांना मेळाव्यात सहभागी होता येईल. याबाबत काही अडचण आल्यास कार्यालयाच्या 0217-2950956 या दूरध्वनीवर अथवा प्रत्यक्ष जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नॉर्थ कोट, पार्क चौक, सोलापूर येथे संपर्क साधावा असे आवाहनही जाधव यांनी केले आहे.
Kadadi Chai reiva Steshan solapur nort maharashtra
Kadadi Chai reiva Steshan solapur nort