- पाकिस्तानच्या महिला संघाची माजी कर्णधार सना मीर हिच्या वक्तव्याने वाद उफाळला आहे. महिला विश्वचषकात काल बांगलादेशाने पाकिस्तानला लोळवले. प्रत्येक ठिकाणी पाकिस्तानचा दारूण पराभव होत असल्याने पाकिस्तानला जबरदस्त मानसिक झटका बसला आहे. त्याचा परिणाम सनावर कालच दिसला. सना काल सामन्याचे समालोचन करत होती. त्यावेळी तिने राजकीय टिप्पणी केली. आझाद काश्मीरचे वक्तव्य करत अक्कलेचे तारे तोडले. आशिया कप 2025 मधील पराभव पाकच्या एकदम जिव्हारी लागल्याचे तिच्या वक्तव्यातून दिसून येते.
- काल बांगलादेश आणि पाकिस्तानमध्ये महिला कपासाठी सामना झाला. त्यात पाक संघ हारला. पाकिस्तानचा संघ खेळत होता. 29 व्या षटकावेळी पाकची नतालिया परवेज ही फलंदाजी करत होती. त्यावेळी नतालिया ही काश्मीरची रहिवाशी आहे, असे सनाने सांगितले. पण नंतर लागलीच तिने ती स्वतंत्र काश्मीरची रहिवाशी असल्याचे मुद्दाम सांगितले. पाकिस्तानने कब्जा केलेला भूभाग हा पाकव्याप्त काश्मीर म्हणून ओळखला जातो. येथे पाकिस्तान धार्जिणे कठपुतली सरकार आहे. पाक हा भाग आझाद काश्मीर असल्याचा कांगावा करतो. सना हिने सुद्धा हाच राजकीय अजेंडा रेटण्याचा प्रयत्न केला. त्यावरून मग एकच वादंग उठले. तिला समाज माध्यमांवर लोकांनी चांगलेच धुतले. ती समाज माध्यमावर चांगलीच ट्रोल झाली. विशेष म्हणजे पाच ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तानचा महिला संघ आमने-सामने येत आहे.
IND vs PAK सामन्याआधी पेटला वाद!
