सोलापूर

पुण्यातील नगरसेवकाने घर भाड्याच्या बदल्यात केली घाणेरडी मागणी

प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने अनेक चित्रपटात काम करून मन जिंकले आहे. तिचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर गाजले आहेत. दरम्यान एका मुलाखतीत तिने धक्कादायक खुलासा केला आहे. फिल्मी करिअरच्या प्रारंभी पुण्यात राहत असताना तिच्यासोबत हा किस्सा घडला.

घरमालक असलेल्या नगरसेवकाने घर भाड्याच्या बदल्यात तेजस्विनीकडे शरीर सुखाची मागणी केली. त्यावेळी तेजस्विनीचा पारा चांगलाच चढला. त्याच क्षणी त्या संबंधित नगरसेवकाच्या टेबलावरील ग्लासातील पाणी फेकून मारले आणि तत्काळ तिथून निघून गेली. तेजस्विनी पुढे म्हणाली, 2009-10 मध्ये ती पुण्यातील सिंहगड रोडवरील एका अपार्टमेंटमध्ये भाड्याने राहत होती.
विशेष म्हणजे ते घर एका नगरसेवकाच्या मालकीचे होते. तेजस्विनी एके दिवशी घराचे भाडे देण्यासाठी त्या नगरसेवकाच्या ऑफिसमध्ये गेली. तेव्हा त्या नगरसेवकाने तेजस्विनीकडे घर भाड्याच्या बदल्यात घाणेरडी मागणी केली.
तेव्हा रागाच्या भरात तेजस्विनीने पाण्याचा ग्लास उचलून त्याच्या तोंडावर मारले. अशा मार्गाचा अवलंब करायचा असता तर मी भाड्याच्या घरात राहिले नसते आणि माझे स्वतःचे घर राहिले असते, दारात गाड्या राहिल्या असत्या, असे तेजस्विनीने त्या नगरसेवकाला अत्यंत कडक शब्दात सुनावले.

Related Articles

Back to top button