सोलापूर

अजितदादांनी चीनचं उदाहरण देत लॉकडाऊनचा विषय काढला अन्…

चीनमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. चीनी सरकारने पुन्हा लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता जगात कोरोनाबाबत खबरदारी आणि उपाययोजना केल्या जात असतानाच आता विरोधी पक्षनेते अजित पवारांनी नागपुरच्या हिवाळी अधिवेशनात कोरोनाचा मुद्दा उपस्थित करत सरकार काय उपाययोजना करत असल्याची माहिती घेतली.
त्यानंतर लगोलग उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.
पवार म्हणाले की, कोरोनाच्या काळात मार्च महिन्यात विदेशातून आलेल्या लोकांमुळे महाराष्ट्रात या विषाणूचा संसर्ग वाढला. त्यामुळे आता इतर देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण सापडत असल्यानं अभ्यास करण्यासाठी आपण समिती नेमणार आहात का?, कोरोना पसरू नये म्हणून लॉकडाऊन लावणार आहात का?,.
त्यानंतर फडणवीस यांनी पवारांच्या प्रश्नांना उत्तर देताना, कोरोनाबाबत उपाययोजना करण्यासाठी टास्क फोर्स किंवा एक समिती गठीत करणार असल्याची घोषणा केली. त्यासाठी मोदी सरकारशी समन्वय साधण्यात येणार असून बदलत असलेल्या स्थितीवर सरकार लक्ष ठेवून आहे.

Related Articles

Back to top button