आधार अपडेटसाठी किती पैसे लागणार?

Admin
2 Min Read
  • भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण, दिल्ली यांच्या सूचनेनुसार आधार नोंदणी व अद्ययावत सेवा तसेच अनिवार्य बायोमेट्रिक अपडेट (MBU) सेवांसाठी सुधारित दर निश्चित करण्यात आले असून, हे दर दि. 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू करण्यात आले आहेत. याबाबत माहिती सोलापूर चे निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
  • सुधारित दर पुढीलप्रमाणे आहेत :
  • – नवीन आधार नोंदणी : निशुल्क
  • – बाल आधार (5 वर्षानंतर) अद्ययावत करणे : निशुल्क
  • – अनिवार्य बायोमेट्रिक अपडेट (5–7 व 15–17 वयोगट) : निशुल्क
  • – अनिवार्य बायोमेट्रिक अपडेट (7–15 वयोगटासाठी, 1 वर्षासाठी) : निशुल्क
  • – अनिवार्य बायोमेट्रिक अपडेट (17 वर्षावरील) : ₹125/- (GST सह)
  • – सर्वसामान्य बायोमेट्रिक व डेमोग्राफिक अपडेट (नाव, पत्ता, जन्मतारीख, मोबाईल नंबर) : ₹125/- (GST सह)
  • – फक्त डेमोग्राफिक अपडेट : ₹75/- (GST सह)
  • – POA/POI दस्तऐवज अपडेट : ₹75/- (GST सह)
  • – SSUP पोर्टलद्वारे POA/POI दस्तऐवज अपडेट : ₹75/- (GST सह)
  • – ई-आधार डाऊनलोड व कलर प्रिंट : ₹40/- (GST सह)
  •  सर्व आधार नोंदणी केंद्रांनी वरील दरानुसारच सेवा द्याव्यात. कोणत्याही केंद्रचालक ऑपरेटरने अधिक रक्कम आकारल्यास नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार करावी. तसेच UIDAI च्या टोल फ्री क्रमांक 1947 वर कॉल करून किंवा help@uidai.gov.in या ईमेलवर तक्रार नोंदवावी.
  • नागरिकांनी फिजिकल आधारऐवजी Mask Aadhaar चा वापर करावा, जेणेकरून आधारचा गैरवापर टाळता येईल, असे आवाहनही पत्रकात करण्यात आले आहे
Share This Article