सोलापूर ब्रेकिंग! जिल्हाधिकाऱ्यांनी दिली खुशखबर
सोलापूर, :- राज्य मागासवर्ग आयोगाच्या सूचनेप्रमाणे जिल्ह्यात दिनांक 23 ते 31 जानेवारी 2024 या कालावधीत मराठा समाज व खुल्या प्रवर्गाचे प्रत्येक गावात जाऊन घर निहाय सर्वेक्षण करण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी सर्वेक्षणासाठी येणाऱ्या प्रगणक व पर्यवेक्षक यांना माहिती देऊन सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.
जिल्ह्यात मराठा समाज व खुल्या प्रवर्गाच्या सर्वेक्षणासाठी प्रशासनाच्या वतीने 6 हजार 473 प्रगणक तर 458 पर्यवेक्षक यांची नियुक्ती केलेली आहे. हे प्रत्येक गावात व प्रत्येक घरी जाऊन सर्वेक्षण करणार आहेत. प्रशासनाने नियुक्त केलेले पर्यवेक्षक व प्रगनक सर्वेक्षणासाठी घरी आल्यानंतर नागरिकांनी त्यांना सहकार्य करणे आवश्यक आहे. तालुका निहाय प्रगणक व पर्यवेक्षक यांची संख्या पुढील प्रमाणे आहे. उत्तर सोलापूर ( 231, 16), बार्शी ( 921. 56), दक्षिण सोलापूर (344, 24), अक्कलकोट (582, 39), पंढरपूर (1150, 74), मोहोळ (525, 37), माढा (698, 51), करमाळा (500, 34), मंगळवेढा (499, 42), सांगोला (450, 32) व माळशिरस(573, 53).