क्राईम
सोलापुरात मोठा राडा
सोलापूर (प्रतिनिधी) किरकोळ कारणावरून मारहाण करून सोन्याची चैन काढून घेतल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १८ जानेवारी रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास अभिमानश्री नगर मुरारजी पेठ येथे घडली. याप्रकरणी प्रमोद नानासाहेब बाबर (वय-३२,रा. अभिमानश्री नगर) यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.त्यांच्या फिर्यादीवरून संकेत ढोबळे,विजय व्यवहारे,अनिकेत व्यवहारे व किरण पवार (सर्व.रा.जुनी पोलीस लाईन) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
- याबाबत अधिक माहिती अशी की, किरण पवार याने हॉटेल व्यवसाय चालू ठेवण्यासाठी तसेच परिवारातील लोकांच्या तक्रारी येऊ नये यासाठी महिना पाच हजार रुपये देणे व नातेवाईकांकडून चिकन खरेदी करण्याचे सांगून ते न झाल्याने फिर्यादी यांच्या हॉटेलमध्ये संकेत ढोबळे याने त्याच्याकडील मुलाला पाठवून किरकोळ कारणावरून भांडणाचे कारण काढून वरील संशयित आरोपी यांनी फिर्यादी यांना मारहाण करून गळ्यातील सोन्याची चैन ओढून नेली आहे, असे फिर्यादीत नमूद आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक दांडगे हे करीत आहेत.