हवामान
खुशखबर! अडकलेल्या ‘मान्सून’ची तारीख ठरली! हवामान विभागाचा नवा अंदाज

- जून महिन्याचा मध्य उलटला तरीही अद्याप महाराष्ट्रात मान्सूनचा पत्ता नाही. त्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या चिंतेत आहे. मान्सून दक्षिण महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये 8 जूनला दाखल झाला परंतू मान्सून वाऱ्याची गती मंदावल्याने मान्सून अडकला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मान्सूनने सध्या आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, तेलंगणा ओडिसा, झारखंड बिहारपर्यंत मजल मारली आहे.
- मोसमी वारे सध्या हरनाई, सोलापूर भागांतून पुढे सरकत असून पूर्व सागरी क्षेत्रासह हैद्राबाद, भद्राचलम, कोरापुट, फुलबणी, रांची, जमुई, मुझफ्फरपूर या मुख्य ठिकाणांवरुन पुढे सरकत आहेत. पुढील 4 ते 5 दिवसांत नैऋत्य मोसमी वारे देशांतील अनेक राज्यांत वाहणार असून यामध्ये तेलंगणा, ओडिशा, झारखंड, बिहार, छत्तीसगडच्या काही भागांत नैऋत्य मान्सून पुढे सरकण्यासाठी हवामान पूरक आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मान्सून लवकरच पोहोचण्यासाठी वातावरण अनूकुल असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.



