1950 नंतरचा सर्वात भीषण ‘एल निनो’ सक्रिय! मान्सूनसाठी धोक्याची घंटा

भारतावर दुष्काळाचे सावट? डिसेंबरमध्ये…
गेल्या काही वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करणाऱ्या बळीराजासमोर आता एक नवे संकट उभे ठाकले आहे. हवामान क्षेत्रातील दिग्गज संस्था असलेल्या ‘क्लायमेट प्रेडिक्शन सेंटर’ने प्रशांत महासागरात ‘अल निनो’चा प्रभाव सुरू झाल्याची अधिकृत माहिती दिली आहे.
1950 नंतरचा सर्वात भीषण ‘एल निनो’ सक्रिय! झाला आहे. हा ‘अल निनो’ 2027 च्या सुरुवातीच्या महिन्यांपर्यंत कायम राहू शकतो. याचा मोठा फटका भारतीय शेतीला, विशेषतः महाराष्ट्राला बसण्याची दाट शक्यता आहे. वातावरणातील तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या उष्णतेचा थेट परिणाम आगामी मान्सूनवर होऊन पावसाचे चक्र विस्कळीत होऊ शकते.
अल निनोमुळे वातावरणातील तापमानात 2 ते 2.5 अंश सेल्सिअसपर्यंत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच पाऊस उशिरा येणे, पावसाच्या दिवसांत मोठा खंड पडणे किंवा एकूण पर्जन्यमान घटणे अशा आव्हानांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागू शकते. तसेच, पुढील वर्षाचा उन्हाळा अत्यंत कडक असेल, असा इशाराही तज्ज्ञांनी दिला आहे. या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शासनाने एका विशेष टास्क फोर्सची नियुक्ती केली आहे.
अल निनोमुळे समुद्री तापमानात होणारी वाढ जागतिक हवामान चक्राला बाधित करते. शेतकऱ्यांनी हवामान विभागाच्या वेळोवेळी येणाऱ्या सूचनांचा विचार करूनच शेतीचे नियोजन करावे, हेच सध्याच्या परिस्थितीत सर्वात सुरक्षित असल्याचे म्हंटले आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत राज्य सरकारने तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत.



