हवामान

पावसाची तूट भरून निघणार, भारतात चांगला मान्सून कोसळणार 

देशात एल निनो सक्रिय झाले असून १९५० नंतरचे सर्वात भयानक प्रभाव यामुळे होणार असल्याचे अमेरिकेच्यावतीने सांगण्यात आले आहे. याचा थेट परिणाम हा भारतातील आणि महाराष्ट्रातील पावसावर होत आहे. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

  1. याच दरम्यान, जपान आणि अमेरिकेच्या संस्थांनी एक दिलासादायक माहिती दिली आहे. हिंदी महासागरात इंडियन ओशन डायपोल अर्थात आयओडी सकारात्मक होण्याची शक्यता आहे. असे जर झाले तर पावसाची तूट भरून निघू शकते, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. मान्सूनबाबत आता काय होणार हे आपण समजून घेणार आहोत.

याबाबत जपान आणि अमेरिका येथील संस्थांनी सकारात्मक माहिती दिली आहे. जपानी हवामानशास्र संस्था आणि अमेरिका येथील ‘नॉर्थ अमेरिकन मल्टी मॉडेल एन्सेम्बल’ जुलैमध्ये हिंदी महासागरातील तटस्थ स्थिती बदलून पाऊस होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ऑगस्ट महिन्यापासून ‘पॉझिटिव्ह आयओडी’ची तीव्रताही वाढू शकते. भविष्यात बाष्पामुळे चांगला पाऊस होतो अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. मान्सून दाखल होण्यासाठी २० जून ही तारीख उजडणार असल्याचे सांगण्यात आलं आहे.

Related Articles

Back to top button