देश - विदेश

ऑपरेशन सिंदूर आणि पहलगाम हल्ल्याची चौकशी करा 

  • काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुन्हा एकदा भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. चव्हाण म्हणाले, सगळे बोगस आणि खोटे आकडे आहेत, शेती विस्कळीत झाली आहे. ऑपरेशन सिंदूर आणि पहलगाम हल्ल्याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दबावाखाली काम करत आहेत. काल अमेरेकेने भारताच्या जहजावर हल्ला केला आणि त्यात 3 जण मारले गेले. आपण विचारले पण नाही, पाऊस पडला नाही तर गंभीर स्थिती निर्माण होईल. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेससोबत महाराष्ट्र पॅटर्न राबवला जात आहे. काँग्रेस एकमेव पक्ष आहे जो याला विरोध करत आहे, असे चव्हाण यांनी म्हटले आहे.
  • दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पोटभर भोजन, डोक्यावर छत सर्वांना मिळावी ही अपेक्षा आहे. मात्र सध्या मूठभर लोकांनाच फायदा मिळत आहे. आपल्याला आता दुसऱ्या स्वातंत्र्य संग्रामसाठी लढाईची तयारी करावी लागेल.

Related Articles

Back to top button