महाराष्ट्र

ब्रेकींग! तुकाराम मुंढेंचा ‘सर्जिकल स्ट्राईक’! हॉटेल्स, टपऱ्यांवर अचानक छापे

  • अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी मोठी धडक कारवाई करण्यात आली. बस स्थानक आणि परिसरातील हॉटेल्स, खाद्यपदार्थांच्या टपऱ्या तसेच विविध विक्री केंद्रांवर अचानक छापे टाकण्यात आल्याने विक्रेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली. 
  • मिळालेल्या माहितीनुसार, एफडीएचे विशेष पथक आज सायंकाळी ५ ते ५.३० वाजण्याच्या दरम्यान पुण्यातील स्वारगेट पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यानंतर पोलीस बंदोबस्तासह पथकाने स्वारगेट बस स्थानक परिसरातील खाद्य व्यवसायांवर अचानक तपासणी मोहीम सुरू केली. कारवाईदरम्यान अधिकाऱ्यांनी विविध हॉटेल्स आणि दुकानांमधील अन्नपदार्थांचा दर्जा, साठवणूक व्यवस्था, स्वच्छता आणि परवान्यांची तपासणी केली. अनेक ठिकाणी अस्वच्छता आणि नियमांचे उल्लंघन आढळल्याने संबंधित व्यावसायिकांना कडक समज देण्यात आली.
  • ज्या दुकानांमध्ये गंभीर त्रुटी आढळल्या, त्यांना तात्काळ स्वच्छता करण्याचे आदेश देण्यात आले. “दुकान आणि परिसराची संपूर्ण स्वच्छता होईपर्यंत व्यवसाय सुरू करू नये,” असे निर्देश एफडीएच्या पथकाने दिले. काही ठिकाणी दुकाने रिकामी करून घेण्यात आल्याचीही माहिती समोर आली आहे.

Related Articles

Back to top button