महाराष्ट्र

ब्रेकिंग! ‘या’ लोकांना आता फक्त अटक नव्हे तर पाच वर्ष जेल ते थेट जन्मठेप

तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय

अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभरात भेसळ आणि प्रतिबंधित अन्नपदार्थांविरोधातील कारवाईला वेग आला असून आता गुटखा व निकोटीनयुक्त पानमसाल्याच्या संघटित रॅकेटविरोधात थेट महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) लागू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

उत्पादक, साठेबाजी, वाहतूकदार, वितरक आणि विक्रेते अशा संपूर्ण साखळीवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

गेल्या महिनाभरात राज्यातील विविध ठिकाणी धाडी टाकून मोठ्या प्रमाणात भेसळीचा व प्रतिबंधित माल जप्त करण्यात आला आहे. संबंधितांवर गुन्हे दाखल करून अटकही करण्यात आली आहे.

मात्र, या कारवायांनंतरही काही भागांत अवैध गुटखा, तंबाखू व निकोटीनयुक्त पानमसाल्याची विक्री सुरू असल्याचे निदर्शनास आल्याने आता आणखी कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंढे म्हणाले की, गुटखा, तंबाखू किंवा निकोटीनयुक्त पानमसाला तसेच तत्सम प्रतिबंधित अन्नपदार्थांचे उत्पादन, साठवणूक, वाहतूक, वितरण आणि विक्री करणाऱ्या संघटित नेटवर्कविरोधात पात्र प्रकरणांमध्ये मकोका अंतर्गत कारवाई केली जाईल.

मात्र, संबंधित आरोपींचा गुन्हेगारी इतिहास आणि कायदेशीर निकष तपासूनच मकोका लागू करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. मकोकाअंतर्गत दोषी ठरल्यास किमान ५ वर्षांपासून जन्मठेपेपर्यंत शिक्षेची तरतूद आहे. जामीन मिळण्यासाठी कठोर अटी असून न्यायालयाकडून विशेष छाननी केली जाते. तपासासाठीही विशेष अधिकार आणि प्रक्रिया लागू असतात, त्यामुळे हा देशातील कठोर फौजदारी कायद्यांपैकी एक मानला जातो.

Related Articles

Back to top button