महाराष्ट्र
गाडी येण्याची चर्चा अन् सगळ्या टपऱ्या बंद

- सध्या राज्यात अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची मोठी चर्चा सुरू आहे. अन्न व औषध प्रशासन विभागात त्यांची बदली झाल्यानंतर राज्यभरात कारवाईचा धडाका सुरू आहे. त्यांच्या या कारवाईच्या धडाक्याचा अनेकांनी धसका घेतला आहे. एक पथक बीडच्या परळी शहरात विविध ठिकाणी कारवाईसाठी येणार असल्याची चर्चा होती. ही बातमी शहरात पसरताच शहरातील सर्वच पान टपऱ्या सकाळपासून बंद झाल्याचे पाहायला मिळाल.
- या ज्या काही पान टपऱ्या बंद झाल्या त्यावरच गुटख्यांची आणि वेगवेगळ्या पानांची विक्री होते. अशातच राज्यात विविध ठिकाणी होणाऱ्या कारवाया पाहून पान टपरी चालकांचे धाबे दणाणले आहेत. परळीत तुकाराम मुंढेंचे पथक आल्याची चर्चा होताच या सर्व पान टपऱ्या बंद दिसून येतात. अन्न औषध प्रशासनाकडून होणाऱ्या कारवाईची अफवा आणि बंद ठेवलेल्या पान टपऱ्या याची जोरदार चर्चा रंगली. गेल्या महिनाभरात तुकाराम मुंढेंनी एकापाठोपाठ एक कारवाया करत 3 कोटी 27 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून 35 पेक्षा जास्त गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मुंढे यांनी चार्ज घेतल्यापासून अन्न व औषध विभागाने राज्यभरात अनेक ठिकाणी धाडी टाकून भेसळीचा माल जप्त केला आहे. संबंधित विक्रेत्यांना अटक करुन त्यांच्यावर गुन्हेही दाखल झाले आहेत.



