देश - विदेश
ब्रेकिंग! आंदोलनादरम्यान मोठा थरार

- नीट परीक्षेतील कथित पेपर लीक आणि बेरोजगारीच्या मुद्द्यांवरून जयपुरात आयोजित करण्यात आलेल्या एका आंदोलनादरम्यान कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांना काही जणांनी कानशिलात मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन तरुणांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
- जयपुरमधील शहीद स्मारक येथे तरुणांच्या विविध प्रश्नांवर कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने एका मोठ्या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. या आंदोलनात मोठ्या संख्येने तरुण एकत्र आले होते. प्रत्यक्षदर्शी आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिजित दिपके हे आंदोलनस्थळी पोहोचले तेव्हा त्यांचे समर्थक त्यांना उत्साहाच्या भरात खांद्यावर उचलून घेत होते.
- त्याच वेळी गर्दीत उपस्थित असलेल्या काही अज्ञात तरुणांनी त्यांना अचानक थप्पड मारली. या घटनेनंतर दिपके यांच्या संतप्त समर्थकांनी संबंधित आरोपींना पकडून मारहाण करण्यास सुरुवात केली. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली.या आंदोलनादरम्यान आंदोलकांनी हातात भ्रष्टाचार आणि पेपर लीक विरोधी घोषणांचे फलक धरले होते.
- कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजीत दीपके यांना मारहाण



