देश - विदेश

गॅस सिलेंडरसह जीवनावश्यक वस्तू होणार स्वस्त

  1. जागतिक स्तरावर इंधन आणि कच्च्या मालाच्या किमतींत घट होत असल्याने भारतीय ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. युद्धजन्य परिस्थिती निवळल्याचा सकारात्मक परिणाम आता भारतीय बाजारपेठेत दिसून येत असून विविध जीवनावश्यक वस्तूंच्या किमती कमी होण्याचे संकेत मिळत आहेत. याचा थेट फायदा सामान्यांच्या खिशाला होणार आहे. भारत आपल्या गरजेच्या 60 टक्के एलपीजी गॅस आखाती देशांतून आयात करतो. जागतिक बाजारात आता गॅसच्या किमती 550 ते 600 डॉलरपर्यंत खाली येण्याचा अंदाज आहे. यामुळे देशांतर्गत घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत 70 ते 100 रुपयांपर्यंत कपात होण्याची शक्यता आहे. तसेच, इंधन स्वस्त झाल्याने लॉजिस्टिक्सचा खर्च कमी होईल, ज्याचा फायदा ई-कॉमर्स आणि फूड डिलिव्हरी सेवा वापरणाऱ्यांना 5 ते 8 टक्के डिलिव्हरी शुल्क कमी होऊन मिळेल.
  2. औद्योगिक आणि कृषी क्षेत्रासाठीही हे बदल फायदेशीर आहेत. खत उत्पादकांसाठी कच्चा माल स्वस्त झाल्याने खतांची उपलब्धता वाढेल, तर प्लास्टिक आणि पॅकेजिंग साहित्यासाठी लागणाऱ्या पॉलिमरच्या किमती 15 टक्क्यांपर्यंत खाली येऊ शकतात. परदेशी फळांच्या किमतीत, विशेषतः खजूर आणि अंजीरमध्ये 25 ते 30 टक्क्यांची घसरण अपेक्षित आहे. याशिवाय, पेंट्स, कोटिंग्ज आणि स्क्रॅप मेटलच्या किमतींतही 8 ते 15 टक्क्यांपर्यंत कपात होण्याची शक्यता आहे. थोडक्यात, जागतिक बाजारपेठेतील या बदलांमुळे महागाईने त्रस्त असलेल्या सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून, दैनंदिन जीवनातील खर्चात लक्षणीय बचत होण्याची आशा निर्माण झाली आहे.

Related Articles

Back to top button