क्राईम
श्रद्धा हत्याकांडात सर्वात मोठा खुलासा ; मृतदेहाचे तुकडे फेकणारा आफताब सीसीटीव्ही फुटेज मध्ये कैद

आपली लिव्ह-इन पार्टनर श्रद्धाची निर्घृण हत्या करणारा आफताब अमीन पूनावाला पोलिसांच्या चौकशीत रोज नवनवीन खुलासे करत आहे. दरम्यान, श्रद्धा खून प्रकरणाचा तपास करणाऱ्या दिल्ली पोलिसांना मोठे यश मिळाले आहे.
पोलिसांना आफताबचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले असून, त्यात तो तीनदा चक्कर मारताना दिसत आहे. श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे फेकण्यासाठी तो बॅग घेऊन बाहेर गेला असावा, असा पोलिसांना संशय आहे. दिल्ली पोलीस मेहरौलीच्या जंगलाव्यतिरिक्त गुरुग्रामपासून दिल्लीपर्यंत अनेक भागात श्रद्धाच्या शरीराचे अवयव शोधण्यासाठी शोध मोहीम राबवत आहेत.
तर दुसरीकडे, सीसीटीव्ही फुटेजमध्ये बॅगसोबत दिसणारा आफताब श्रद्धाच्या शरीराच्या अवयवांची विल्हेवाट लावताना दिसत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. आफताबने आधी श्रद्धाचा गळा दाबून खून केला आणि त्यानंतर चॉपरने मृतदेहाचे 35 तुकडे केले. त्यानंतर एक फ्रीज विकत घेतला. त्यात शरीराचे कापलेले भाग साठवले आणि बऱ्याच दिवसांनी ते फेकून दिले.
पोलिसांनी 18 ऑक्टोबरचे सीसीटीव्ही फुटेज पाहिले आहेत. ज्यामध्ये आफताब बॅग घेऊन जाताना दिसत आहे. या व्हिडिओवरून असा संशय व्यक्त करण्यात येत आहे की, तो आपल्या मैत्रिणीच्या शरीराचे तुकडे फेकण्यासाठी जात आहे.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये आफताब तीन फेऱ्या मारत असल्याचे दिसून आले. ज्यावरून आरोपी श्रद्धाच्या अवयवांची विल्हेवाट लावण्यासाठी बॅग घेऊन बाहेर पडला असावा, असा संशय पोलिसांना आला आहे. दरम्यान, श्रद्धा हत्याकांडातील हरवलेल्या महत्त्वपूर्ण पुराव्याचा शोध घेण्यासाठी दिल्ली पोलिसांची मेहरौली जंगलात शोध मोहीम सलग सहाव्या दिवशीही सुरू आहे.
निष्पाप व निरागस मुलीने आपल्या आई वडिलांना सोडून कोणत्याही जाती धर्माचा विचार न करता फसव्या मित्रावर विश्वास टाकून प्रेमविवाह केला,शेवटी दगा व कटकारस्थान करून जीवाशी खेळ करून जीवनातूनच उठवणाऱ्या अशा व्यक्तीला फाशीची शिक्षा तर द्यायलाच हवं,किंवा शरीराचे 35 तुकडे होईतोपर्यत शरीरावर घाव घालून जखमेच्या वेदना काय असतात याची जाणीव होईपर्यंत शरीराचे तुकडे तुकडे करावेत म्हणजे होणारे हाल हे काय आहेत याची जाणीव मरते वेळीस तरी होईल,न्यायालयाने अजिबात सहानुभूती दाखवू नये,जर अशा घटना घडल्यास ज्याच्या वर अन्याय झालेला आहे अशा शिक्षेनं न्याय तरी मिळेल,अन पुढील काळात अशा घटना घडणार नाहीत.हीच मनोमन श्रद्धांजली!💐💐💐