- एका तरुणाला प्रेमविवाह करणे आणि पत्नीसोबतचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करणे खूप महागात पडले आहे. तरुणीच्या संतापलेल्या कुटुंबियांनी त्याच्यावर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला केला आणि त्याचे दोन्ही हात-पाय तोडून टाकले. जखमी तरुणावर सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. तरुणाच्या वडिलांच्या तक्रारीनुसार तरुणीचे वडील, काका आणि इतर 4-5 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हरियाणातील सोनीपत जिल्ह्यातल्या गन्नौरमध्ये हा प्रकार घडला आहे.
- कुणाल असे या प्रकरणातील पीडित तरुणाचे नाव आहे. त्याने या विषयावर माहिती देताना सांगितले की, त्याचे गेल्या वर्षी दिल्लीची रहिवासी असलेल्या कोमल या तरुणीसोबत लग्न झाले. विशेष म्हणजे त्यांचे लव्ह मॅरेज होते. लग्नानंतर ते काही काळ एकत्र राहिले, परंतु नंतर कोमल अचानक घरातून निघून गेली. कोमलने
- कुणालवर मारहाणीचा गुन्हा दाखल केला. तसेच खर्चासाठी त्याच्याकडून दरमहा 30 हजार रुपयांची मागणी केली. कुणालचा पगार हा 12 हजार रुपये आहे.
- हे प्रकरण सध्या न्यायालयात विचाराधीन आहे, ज्याची पुढील सुनावणी 25 ऑक्टोबर रोजी होणार आहे. दरम्यान, कोमलच्या कुटुंबियांनी उत्तर प्रदेशातील शामली येथे तिचे दुसरे लग्न लावून दिले. कुणालने कोमलसोबतचे आपले काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले होते, ज्यामुळे कोमलच्या नवीन सासरच्या मंडळींकडून तिला जाब विचारला जात होता, असे सांगितले जात आहे.
- कुणालने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत सांगितले की, 24 सप्टेंबर रोजी तो आपल्या वडिलांसोबत गन्नौरहून बाईकवरून गावी परतत होता. वाटेत बादशाही रोडवर दोन बाईकवर आलेल्या 4-5 तरुणांनी त्यांना थांबवले आणि लाठी-काठ्या आणि धारदार शस्त्रांनी त्यांच्यावर हल्ला केला. कुणालचा आरोप आहे की, हल्लेखोरांमध्ये युवतीचे वडील सतीश आणि काका राकेश यांचाही समावेश होता. हल्लेखोरांनी कुणालचे दोन्ही हात आणि पाय तोडले. या हल्ल्याचे मुख्य कारण कोमलसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करणे हे सांगितले गेले आहे.
- सोनीपत पोलिस प्रवक्ते रविंद्र कुमार यांनी या घटनेला दुजोरा देताना सांगितले की, पीडित तरुणाच्या वडिलांच्या तक्रारीवरून युवतीचे वडील, काका आणि इतर लोकांविरुद्ध गन्नौर पोलिस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोशल मीडियावर तो फोटो शेअर केला आणि…
