- बीडमधील नारायण गडावर आज पार पडलेल्या दसरा मेळाव्यात मराठा नेते मनोज जरांगे पाटील हे उपस्थित होते. प्रकृती काहीशी अस्वस्थ असतानाही ते कार्यक्रमाला हजर होते आणि राज्यातील हजारो मराठा कार्यकर्ते उपस्थित होते. या मीटिंगमध्ये त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या सध्याच्या दुर्दशेबाबत आणि शासनाने घेतलेल्या निर्णयांवर कठोर टिपण्णी केली.ते म्हणाले की, ज्यांचे शेत पाण्याने वाहून गेले किंवा पिक नष्ट झाले त्यांना प्रत्येकी एक लाख तीस हजार रुपये दिले जावे.
- जरांगे यांनी विशेषतः उद्योगपती, राजकीय नेते आणि सेलिब्रिटींचा उल्लेख करत सांगितले की, अंबानी, अदानी, जेष्ठ नेते शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री फडणवीस, राज ठाकरे, शिंदे यांच्याकडून किंवा जैन-मारवाडी यांच्याकडून पैसे मिळवून शेतकऱ्यांना वितरित करावे. तसेच शाहरुख खान, मोठ्या मालमत्ता असणारे लोक आणि उद्योगपती यांच्याकडून आर्थिक मदत वसूल केली जाऊ शकते.
शरद पवार, राज ठाकरे, उद्धव ठाकरे, फडणवीस, शाहरुख खानकडून पैसे घ्या!
