अवतीभवती गोल्डनमॅनचा वावर!

Admin
1 Min Read
  • राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार नेहमीच आपल्या रोखठोक त्याचबरोबर मिश्किल टिप्पणी करून माध्यमांमध्ये देखील हशा पिकवतात. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा अशाच प्रकारे मिश्किल टिप्पणी करत पुणे आणि जिल्ह्यामध्ये गोल्डन मॅन म्हणून मिरवणाऱ्यांना फटकारले आहे.

  • अजितदादा हे पुण्यामधील चाकण येथे रांका ज्वेलर्स या प्रसिद्ध ज्वेलर्सच्या दुकानाच्या उद्घाटनासाठी आले होते. यावेळी त्यांनी एक वक्तव्य केले. ते म्हणाले, सोनं हे पुरुषांना शोभून दिसत नाही. तर ते स्त्रियांनाच शोभून दिसते. त्यामुळे पुरुषांनी सोन्याच्या भानगडीत पडू नये. नाहीतर जे पुरुष सोनं घालतात. ते बैलाला साखळी घातल्यासारखं दिसते. हा प्रश्न ज्याच्या-त्याच्या पैशांचा आहे. पण सोनं हा स्त्रिचा दागिना म्हणून शोभून दिसतो, याची आठवण यावेळी अजितदादा यांनी गोल्डनमॅन म्हणून मिरवणाऱ्यांना करून दिली आहे.

  • अजितदादा म्हणाले, लोकांचे राहणीमान बदलत आहे, क्रयशक्ती वाढत आहे. साहजिक लोकांना अंगावर सोनं घालावेस वाटत आहे. लोक सोन्याच्या दुकानात जाऊन चांगल्या प्रतिचे सोने विकत घेत आहेत. सोने हे गुंतवणुकीसाठी चांगले आहे. उद्या कुटुंबावर एखादी वेळ आली तर सोने मोडून निकड भागवता येते किंवा बँकेत गहाण ठेवता येते. आपल्याकडे गोल्डन मॅन म्हणून काही जणांची ओळख आहे. काहींनी सोन्याचे कपडेच शिवले आहेत. पण हे अति होत आहे.

Share This Article