- राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक भागात नदी नाल्यांना पूर आला आहे. परिणामी शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे पडणारा पाऊस कधी थांबणार, असा सवाल शेतकरी करत आहेत. अशातच एक महत्वाची बातमी समोर आली आहे. येत्या ८ ऑक्टोबरपासून मान्सून राज्यातून निरोप घेणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.
- 29 सप्टेंबरपासून राज्यातील बहुतांश भागात हवामान स्थिर आहे. मात्र, 2 ते 7 ऑक्टोबर दरम्यान विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे, जो प्रामुख्याने मेघ गर्जनेसह राहील आणि दुपारनंतर पडेल. वादळी पावसाची सर्वात अधिक शक्यता विदर्भात राहील. काढणी केलेली पिके पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावीत, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.
- 7 ऑक्टोबरपासून राज्यात हवामान स्थिर होण्यास सुरुवात होईल. सुमारे 8 ऑक्टोबरपासून मान्सून राज्यातून निरोप घेईल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.
राज्यातून मान्सून कधी निरोप घेणार?
