महाराष्ट्र
ब्रेकिंग! किल्लारी परिसरात पुन्हा भूकंपाचा धक्का
लातूर जिल्ह्यातील किल्लारी परिसरात शनिवारी पुन्हा भूकंपाचे धक्के बसले. किल्लारीसह परिसरातील पाच किलोमीटरपर्यंत या भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. या भूकंपाने १९९३ मध्ये झालेल्या महाप्रलयंकारी भूकंपाच्या कटू आठवणी ताज्या झाल्या.
औसा तालुक्यातील किल्लारीसह कारला, कुमठा, सिरसल, येळवट, मोगरगा, तळणी आणि निलंगा तालुक्यातील नदीहत्तरगा परिसरामध्ये रात्री २ वाजून ०६ मिनिटांनी जाणवलेल्या भूकंपाची रिश्टर स्केल २.४ इतकी नोंद झाल्याची माहिती देण्यात आली आहे. जमीन हादरल्याने अनेकांना जाग आली.
जमिनीखालून एखादी रेल्वे धावत जावी, अशा पद्धतीचा भास या सौम्य धक्क्याने नागरिकांना झाला. पत्र्याच्या शेडमध्ये आवाज घुमू लागला. ज्यांना जाग आली, त्यांनी रात्र जागून काढली.