महाराष्ट्र

राज्यपालांचे धोतर फाडणाऱ्याला एक लाखाचे बक्षीस

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श होते तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आधुनिक काळातील आदर्श आहे असे त्यांनी म्हटले.
औरंगाबाद येथे काल डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये दिक्षांतर समारंभ पार पडला. या कार्यक्रम सोहळ्यात कोश्यारी बोलत होते. राज्यपालांच्या या विधानाने नव्या वादाला तोंड फुटले आहे.
कोश्यारी म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श होते तर गडकरी हे आधुनिक काळातील आदर्श आहेत. गडकरींनी देशात चांगले रस्ते बनवले आहेत. लोक तर आता त्यांना गडकरी ऐवजी रोडकरी म्हणू लागले आहेत. गडकरींची स्तुती करताना राज्यपाल शिवाजी महाराजांना मात्र जुने आदर्श असे बोलून गेले आणि विरोधकांना आयते कोलीत मिळाले.
दरम्यान या प्रकरणावरून राज्यातील वातावरण पेटले आहे.

राज्यपाल यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. पुण्यात राष्ट्रवादी पक्षाने लावलेल्या बॅनरने सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. राज्यपालांचे धोतर फाडणाऱ्याला एक लाख रुपयांचे रोख बक्षीस देण्यात येईल, असे या बॅनरमध्ये नमूद करण्यात आले आहे. पुण्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संदीप काळे यांनी हे बॅनर लावले आहे. तर दुसरीकडे विविध राजकीय पक्ष, संघटना यांनी कोशारी यांच्यावर टीका केली आहे. सोलापुरातही या घटनेचा निषेध होत आहे. 

Related Articles

Back to top button