राजकीय

लोकसभेची पुनरावृत्ती? अजितदादांना बसणार मोठा धक्का?

  • राज्यात विधानसभा मतदारसंघासाठी काल मतदान पार पडले. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या अंदाजित आकडेवारीनुसार राज्यात 65.02 टक्के इतके मतदान झाले. 2019 च्या निवडणुकीच्या तुलनेत हे मतदान काही टक्क्यांनी जास्त झाले आहे. त्यामुळे आता राज्यात कोणाची सत्ता येणार हे 23 तारखेला पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपात अजितदादा पवार गटाला कमी जागा मिळाल्या होत्या. अजितदादा गटाने एकूण 54 जागांवर उमेदवार दिले होते. आता एक्झिट पोलचे आकडे पाहिले तर कमी जागा निवडून येण्याची शक्यता आहे. यामुळे अजितदादा पवारांची राजकीय ताकद कमी होऊ शकते. लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही काका शरद पवार भारी पडल्याचे दिसून येत आहे.
  • मागील लोकसभा निवडणुकीतही महायुतीच्या जागावाटपात अजितदादा यांच्या राष्ट्रवादीला चार जागा मिळाल्या होत्या. मात्र फक्त एकच जागा जिंकता आली. रायगड लोकसभा मतदारसंघातून सुनील तटकरे विजयी झाले होते. या निवडणुकीत राष्ट्रवादीचा स्ट्राईक रेट अतिशय कमी राहिला होता.
  • याउलट लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने सरस कामगिरी केली होती.
  • इलेक्टोरल एजने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार अजितदादा गटाला साधारण 14 जागा मिळतील, असा अंदाज आहे. तर शरद पवार गटाचे उमेदवारी 46 जागांवर बाजी मारतील अशी शक्यता आहे. मॅट्रिझच्या एक्झिट पोलनेही शरद पवारांच्याच बाजून कौल दिला आहे. या निवडणुकीत अजितदादा गटाला 17 ते 26 च्या दरम्यान जागा मिळतील तर दुसरीकडे शरद पवार गटाला 35 ते 43 दरम्यान जागा मिळतील, असा या एक्झिट पोलचा मूड आहे.
  • चाणक्यच्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार शरद पवार गटाला 40 पेक्षा जास्त जागा मिळू शकतात तर अजितदादा गटाला 22 पेक्षा जास्त जागा मिळण्याची शक्यता आहे. पोल डायरीनेही शरद पवार गटाला झुकतं माप दिलं आहे. या एक्झिट पोलमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाला 18 ते 28 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे तसेच शरद पवार गटाला 25 ते 39 दरम्यान जागा मिळतील, अशी शक्यता आहे.

Related Articles

Back to top button