- केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. याआधी मतदारयादीतून नाव वगळण्याच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणल्यानंतर आता आयोगाने मतमोजणी प्रक्रियेबाबत महत्त्वाचा नियम जारी केला आहे. या निर्णयामुळे मतमोजणी अधिक पारदर्शक, शिस्तबद्ध आणि वेगवान होणार आहे.
- आयोगाने जारी केलेल्या नव्या नियमांनुसार, पोस्टल बॅलेटची मोजणी पूर्ण होण्यापूर्वी शेवटच्या दुसऱ्या फेरीची ईव्हीएम मतमोजणी सुरू करता येणार नाही. यापूर्वी ईव्हीएम मतमोजणी पोस्टल बॅलेटची मोजणी पूर्ण होण्याआधी सुरू केली जात होती. या बदलामुळे कोणत्याही प्रकारचा गोंधळ, वाद किंवा तक्रारी टाळता येणार आहेत.
- गेल्या काही निवडणुकांमध्ये पोस्टल बॅलेट मतांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दिव्यांग मतदार आणि ८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी घरबसल्या मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे ही वाढ लक्षणीय आहे. या मतांची अचूक आणि वेळेत मोजणी व्हावी यासाठी आयोगाने अधिक टेबल्स आणि कर्मचारी उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत.
- निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे मतमोजणी प्रक्रियेत पारदर्शकता आणि शिस्त राहील. त्यामुळे राजकीय पक्ष, उमेदवार आणि मतदार यांच्यात विश्वासाचे वातावरण निर्माण होईल. अनेकदा पोस्टल बॅलेटच्या मुद्यावरून आरोप-प्रत्यारोप होत असत. मात्र आता या नव्या नियमामुळे वाद-विवाद कमी होण्याची अपेक्षा आहे.
निवडणूक आयोगाचा सर्वात मोठा निर्णय
