- राज्यात गेल्या काही दिवसांपासून सोलापूरसह अन्य भागात मुसळधार पाऊस सुरु असल्याने अनेकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. राज्यातील अनेक गावात पूरस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावा लागत आहे.
- तर आता हवामान विभागाने राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरावर एक कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात 26 ते 28 सप्टेंबर दरम्यान ढगाळ हवामान आणि पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
- बंगालच्या उपसागरावर एक कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे आणि त्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांमध्ये 26 ते 28 सप्टेंबर दरम्यान ढगाळ हवामान आणि पावसात वाढ होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
ब्रेकिंग! हवामान विभागाचा नवा अंदाज आला
