- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 75 वा वाढदिवस साजरा केल्यानंतर ते आता पंतप्रधानपदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकारणात जोराने सुरु आहे. यातच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मोठा दावा केल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. पंतप्रधान मोदी राजीनामा देणार असून आरएसएसच्या मदतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान होणार असल्याचा दावा सपकाळ यांनी केला आहे.
- पुण्यात माध्यमांशी बोलताना सपकाळ म्हणाले की, फडणवीस यांना पंतप्रधानपदाची स्वप्न पडत आहेत. फडणवीस हे नागपूरचे रहिवासी आहेत. त्यामुळे रेशीम बागेचे वारं हे त्यांच्या कानावर लवकर येते. तिथून त्यांना संकेत आले आहेत की 75 वर्ष झाल्यानंतर मोदी यांचा राजीनामा आम्ही घेणार आहोत. त्याबाबतच्या सूचना देखील मोदी यांना रेशीम बागेतून देण्यात आली असल्याचे सूत्र सांगतात. त्यामुळे मोदी जाणार आणि नवीन पंतप्रधान होणार, अशी माहिती फडणवीस यांच्याकडे आहे, असे सपकाळ म्हणाले.
मोदी राजीनामा देणार अन् फडणवीस पंतप्रधान होणार
