- पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी पाच वाजता देशाला संबोधित करणार आहेत. या भाषणादरम्यान मोदी कोणती मोठी घोषणा करणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे. मात्र मोदी कोणत्या विषयावर देशाला संबोधित करणार आहेत याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहे.
- दरम्यान उद्यापासून नवीन जीएसटी दर लागू होणार असल्याने मोदी देशाला संबोधित करणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.
- तर दुसरीकडे यापूर्वी देखील मोदी यांनी अनेक वेळा देशाला संबोधित केले आहे. यापूर्वी त्यांनी राष्ट्राला संबोधित करत कोरोना काळात लॉकडाऊनची घोषणा केली होती. तर त्यापूर्वी त्यांनी राष्ट्राला संबोधित करत नोटबंदीची देखील घोषणा केली होती.
- 2016 मध्ये झालेल्या सर्जिकल स्ट्राईक आणि 2019 मध्ये बालाकोट एअरस्ट्राईकनंतर मोदी यांनी देशाला संबोधित केले होते.
पंतप्रधान मोदी आज संध्याकाळी पाच वाजता देशाला संबोधित करणार
