- दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आणि राजकीय नेते विजय यांच्या तामिळनाडू वेत्री कळघम पक्षाच्या रॅलीमध्ये आज एक मोठी दुर्घटना घडली आहे. तामिळनाडूच्या करूर येथे आयोजित केलेल्या या जाहीर सभेत झालेल्या चेंगराचेंगरीत आतापर्यंत किमान 31 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत आहे, तर अनेक लोक जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता स्थानिक प्रशासनाने वर्तवली आहे.
- चेंगराचेंगरी होण्यापूर्वीचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये विजय व्यासपीठावरून जनतेला संबोधित करताना दिसत आहेत. गर्दीतील गोंधळ पाहून त्यांनी आपले भाषण अचानक थांबवले. त्यांनी तेथील कार्यकर्त्यांना पाण्याच्या बाटल्या उपलब्ध करून देण्यास सांगितले. तसेच, त्याचवेळी एका लहान मुलीच्या हरवल्याची माहिती मिळाल्यावर, विजय यांनी तातडीने कार्यकर्त्यांना तिला शोधण्यासाठी मदत करण्याची विनंतीही केली होती.
बिग ब्रेकिंग! दाक्षिणात्य सुपरस्टार, अभिनेते विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी
