- पाकिस्तानी हवाई दलाच्यावतीने एक भयानक कृत्य करण्यात आले आहे. दुश्मनांवर हल्ला करण्यासाठी असलेले हवाई दल मात्र पाकिस्तानसाठीच कर्दनकाळ ठरू लागले की काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण, पाकिस्तान हवाई दलाने स्वतःच्याच नागरिकांवर एअर स्ट्राईक केल्याचा आरोप केला जात आहे. खैबर पख्तूनख्वा प्रांतातील तिराह खोऱ्यात झालेल्या या भीषण हल्ल्यात 30 हून अधिक निरपराध नागरिकांचा मृत्यू आणि 20 हून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
- रविवार आणि सोमवारच्या मध्यरात्री, पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास पाकिस्तानी हवाई दलाच्या जेएफ-१७ लढाऊ विमानांनी खैबर पख्तूनख्वाच्या तिराह खोऱ्यातील मत्रे दारा या गावावर हल्ला केला.
- या हल्ल्यात किमान ८ बॉम्ब टाकण्यात आले. यामुळे गावातील पाच घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आणि परिसराचे मोठे नुकसान झाले. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये महिला आणि मुलांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. बॉम्बस्फोटांचा आवाज इतका मोठा होता की, संपूर्ण परिसर हादरला. सर्वत्र मृतदेह विखुरलेले होते आणि जखमींचा आक्रोश ऐकू येत होता.
ब्रेकिंग! आता याला काय म्हणावं ! पाकिस्तानने त्यांच्याच देशात केला एअरस्ट्राईक
