- देशातील एलपीजी ग्राहकांना पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक बोर्ड मोठा अधिकार देण्याच्या तयारीत आहे. त्यानुसार लवकरच ग्राहक मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी प्रमाणेच आपली सध्याची गॅस कंपनी बदलू शकतील. गॅस पुरवठादाराची खराब सेवा, डिलिव्हरीला होणारा विलंब किंवा डीलरची मनमानी यामुळे त्रस्त असलेल्या ग्राहकांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे या पुढच्या काळात जर तुम्ही एखाद्या गॅस कंपनीबाबत नाराज असाल तर तुम्ही तुमच्या आवडीची गॅस कंपनी निवडू शकणार आहात. ते तुमच्यासाठी अधिक सुलभ होणार आहे.
- सध्या पोर्टेबिलिटीची सोय एकाच कंपनीच्या वेगवेगळ्या डीलर्सपर्यंत मर्यादित होती. म्हणजे, एका कंपनीचा ग्राहक फक्त त्याच कंपनीच्या दुसऱ्या डीलरकडून रिफिल घेऊ शकत होता. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक बोर्ड ही मर्यादा दूर करण्याची योजना आखत आहे. यामुळे ग्राहक नवीन कनेक्शन न घेता केवळ आपल्या सेवेचा पुरवठादार बदलू शकतील. या नव्या पोर्टेबिलिटी पर्यायामुळे गॅस कंपन्यांमध्ये स्पर्धा वाढेल. ज्यामुळे ग्राहकांना मिळणाऱ्या सेवेत सुधारणा होईल. खराब सेवा मिळाल्यास ग्राहक त्वरित दुसरी कंपनी निवडू शकतील.
- एलपीजी सिलेंडरर्सची किंमत जवळपास समान असल्याने आता ग्राहक केवळ सेवेच्या आधारावर कंपनी निवडू शकतील. तातडीच्या वेळी किंवा डीलरकडे स्टॉक उपलब्ध नसल्यास ग्राहक लवकरच जवळच्या कोणत्याही कंपनीच्या डीलरकडून सिलिंडर रिफिल करू शकतील.
- सध्या कंपनी बदलणे शक्य नव्हते. फक्त एकाच कंपनीचे डीलर बदलता येत होते. म्हणजेच, एचपी गॅसचा ग्राहक फक्त एचपीच्या दुसऱ्या डीलरकडे जाऊ शकत होता. आता पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक बोर्ड ही बोटचेपी अट हटवणार आहे. याचा अर्थ, तुम्ही नवीन कनेक्शन न घेता खराब सेवा देणाऱ्या कंपनीला टाटा-बाय-बाय करून दुसरी चांगली कंपनी निवडू शकाल. तसेच ग्राहकाला सेवेवर आधारित कंपनी निवडण्याचा हक्क मिळणार आहे.
गॅस कंपनीच्या मनमानीला आता फुलस्टॉप
