पुणे-सोलापूर महामार्गावर भयंकर अपघात

Admin
1 Min Read
  • पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मोठा अपघात घडला आहे. याचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ही घटना दौंड तालुक्यातील वाखारी गावच्या हद्दीत घडली. 
  • दोन टेम्पोची समोरा-समोर धडक होऊन हा अपघात घडला. या अपघातात एकाच जागीच मृत्यू झाला आहे.
  • हा अपघात काल दुपारच्या सुमारास घडला असून अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे, ज्यामुळे त्याची तीव्रता स्पष्टपणे दिसून येते. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याच्या दिशेने सोलापूरकडे जाणाऱ्या एका टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटले आणि टेम्पो थेट डिव्हायडर ओलांडून दुसऱ्या बाजूच्या रस्त्यावर आला आणि समोरून येणाऱ्या दुसऱ्या टेम्पोला जोरदार धडक दिली. 
  • हा अपघात इतका भयानक होता की, अपघाताचा व्हिडिओ पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल. पोलीस आता याचा तपास करत असून अपघात नेमका कसा घडला? याचा शोध घेत आहेत.
Share This Article