फायनल संपल्यानंतर एक तास राडा

Admin
1 Min Read
  • आशिया कपच्या अंतिम सामन्यात भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानला चितपट करत आपले वर्चस्व सिद्ध केले. कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियाने पाच गडी आणि दोन चेंडू राखून सहज विजय मिळवला. नवव्यांदा आशिया कपचे जेतेपद पटकावले. या विजयामुळे भारताने केवळ गतविजेतेपद कायम ठेवले नाही, तर पाकिस्तानवर सलग तिसरा दणदणीत विजय नोंदवला.
  • अंतिम सामन्यात टॉसपासूनच भारतीय संघाने स्पष्ट संकेत दिले की, कुठेही समझोता नाही. समालोचक रवि शास्त्री यांच्याशी पाकिस्तानच्या खेळाडूंनी संवाद साधण्यास नकार देण्याचे नाटक केले, मात्र त्यातूनही त्यांचीच लाज गेली.
  • खरा धक्का मात्र बक्षीस समारंभावेळी बसला. आशियाई क्रिकेट परिषद अध्यक्ष आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डप्रमुख मोहसिन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास भारतीय खेळाडूंनी नकार दिला. सामनावीर, मालिकावीर आणि उपविजेत्या संघांना पुरस्कार देण्याची औपचारिकता पूर्ण झाली, मात्र विजेतेपद देताना भारतीय संघाने नकवींच्या हस्ते ट्रॉफी न घेतल्याने त्यांचा चेहराच पडला. शेवटपर्यंत भारत आपल्या भूमिकेवर ठाम राहिला आणि नकवींना त्यांच्या जागी बसवले.
  • या संपूर्ण स्पर्धेत भारताने पाकिस्तानला तीनदा पराभूत करून लायकी दाखवली. शेवटचा डाव ट्रॉफी समारंभावेळी खेळला गेला आणि तोही भारतानेच जिंकला. मैदानात पराभव आणि मंचावर अपमान अशा दुहेरी पराभवामुळे पाकिस्तानची अवस्था केविलवाणी झाली.
Share This Article