पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार

Admin
1 Min Read
  • आशिया कपच्या अंतिम सामन्यात भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानला चितपट करत आपले वर्चस्व सिद्ध केले. पहिल्यापासूनच भारतीय संघाने आक्रमक पवित्रा घेतला होता. पाकिस्तानविरुद्ध ‘नो हँडशेक पॉलिसी’ ते थेट आशियाई क्रिकेट परिषद अध्यक्ष आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डप्रमुख मोहसिन नकवींकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. दुसरीकडे पाकिस्तान टीम मात्र त्यांचे रंग दाखवतच आहे. त्यांनी आता थेट दहशतवाद्यांना पाठिंबा देत मॅस फिस दहशतवाद्यांच्या कुटुंबाला देण्याची घोषणा त्यांच्या कॅप्टनकडून जाहीरपणे करण्यात आली आहे.
  • पाकिस्तानी कर्णधार सलमान अली आगा याने घोषणा केली. त्याने सांगितले की, पाकिस्तानी टीम त्यांची मॅच फीस भारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये मारलेल्या नागरिकांच्या कुटुंबाला दान करणार आहे. मात्र यामध्ये जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरचे कुटुंब आणि लष्कर ए तैयबाचे दहशतवादी देखील यामध्ये मारले गेले होते. त्यानंतर भारताने पाकिस्तानच्या एअरबेसवर हल्ला केला होता. त्यामध्ये सैन्याचे जवान आणि अधिकारी मारले गेले होते. त्यामुळे पाक टीमची ही मदत सामान्य नागरिकांना नाही तर दहशतवाद्यांना असल्याचे स्पष्ट आहे.
  • मात्र पाकिस्तानचे हे दहशतवाद्यावरील प्रेम पहिल्यांदा नाही. तर या अगोदर पाकिस्तानचा माजी कॅप्टन आणि माजी पंतप्रधान इमरान खान याने तालिबानला दिलेल्या पाठिंब्यामुळे त्याला तालिबान खान नावाने ओळखले जाते. त्यानंतर आता तर पाकिस्तान टीमने थेट ऑपरेशन सिंदूरमध्ये मारले गेलेल्या दहशतवाद्यांना मॅचची फीस दान करण्याचा निर्णय घेतला आहे.
Share This Article