- बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा दिवसेंदिवस तीव्र होत आहे, त्याचा परिणाम थेट महाराष्ट्रावर होत आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, हा कमी दाबाचा पट्टा पश्चिमेकडे सरकत आहे, त्यामुळे राज्यात पुढील चार ते पाच दिवस मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
- दरम्यान, राज्यात मान्सूनच्या परतीचा प्रवास उशिरा होणार आहे. नेहमीप्रमाणे ५ ऑक्टोबरपासून परतीची सुरुवात व्हायची, मात्र यंदा ती १० ऑक्टोबरनंतर सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाचा कालावधी आणखी लांबणार आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांत मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पूरस्थिती निर्माण झाली. पाणी हळूहळू ओसरत असतानाच हवामान खात्याचा नव्याने दिलेला अंदाज भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. नागरिकांना पुन्हा एकदा तुफानी पावसाचा सामना करावा लागेल का, याची काळजी आहे.
मोठी बातमी! गेलेला पाऊस पुन्हा कसा आला, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा किती दिवस राहणार?
