- सोलापूर जिल्ह्यात सीना नदी वडकबाळ येथे आणि भीमा नदी टाकळी येथे इशारा पातळीच्यावर वाहत आहे. सीना नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने स्थानिक प्रशासन आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची पथके तैनात करण्यात आली आहेत.
- सरकार गरज भासल्यास नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यास तयार आहे.
- दरम्यान रायगड जिल्हा आणि पुणे घाट परिसरात २८ सप्टेंबर रोजी ‘रेड अलर्ट’ घोषित करण्यात आला आहे. पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, छत्रपती संभाजीनगर तसेच सातारा आणि कोल्हापूर घाट परिसरात ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आल्याची माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने दिली आहे.
ब्रेकिंग! हवामान खात्याचा अंदाज तंतोतंत खरा ठरतोय
