- गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने थैमान घातले आहे. अनेक भागांमध्ये अतिवृष्टी होऊन पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. मात्र, पाऊस अजूनही थांबण्याचे नाव घेत नाही. दरम्यान, आज भारतीय हवामान विभागाकडून अनेक भागांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई आणि ठाण्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. सकाळपासूनच पावसाला सुरूवात झाली आहे. जालना आणि इतर काही भागांमध्येही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
- पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर आज जोरदार पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिली. पुण्याच्या घाटमाथ्यावर आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. गोव्यासह संपूर्ण महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. पुण्यात मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस सुरू असल्याने अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले. हवामान खात्याच्या अंदाजानुसार ठाण्यात पावसाला सुरुवात झाली आहे. अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला. सोलापूर शहर आणि जिल्ह्यासाठी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. सोलापुरात पावसाचा जोर प्रचंड वाढला आहे.
राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस
