- राज्यात पुढील दोन आठवडे जोरदार पाऊस राहणार असून २१ सप्टेंबरपर्यंत विविध भागांत कमी-जास्त प्रमाणात सरी पडतील. कोकण किनारपट्टीवर अतिवृष्टीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
- हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात पुढील दोन आठवडे पावसाचा जोर कायम राहणार आहे. राज्यातील अनेक भागात आधीच सरासरीपेक्षा जास्त पाऊस नोंदला गेला असून काही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
- 20 ते 25 सप्टेंबर: तळकोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागांत सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता.
- २६ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर: दक्षिण मध्य महाराष्ट्र वगळता, कोकण किनारपट्टीसह बहुतांश भागांत जोरदार पाऊस होण्याचा अंदाज. विशेषतः कोकण किनारपट्टीवर अतिवृष्टीची शक्यता वर्तवली आहे.
- मान्सून परतीच्या उंबरठ्यावर असला तरी स्थानिक हवामान प्रणाली आणि बंगालच्या उपसागरातील आर्द्रतेमुळे राज्यात पावसाचा जोर टिकून राहणार असल्याचे हवामान तज्ज्ञांचे मत आहे.
ब्रेकिंग! नवरात्रीत राज्यात पावसाचा जोर वाढणार