जीएसटी परिषदेची बैठक अलीकडे नवी दिल्लीत पार पडली. यात ऐतिहासिक निर्णय घेण्यात आले. जीएसटीचे चारऐवजी तीन स्लॅब करण्यात आले आहेत. १८ टक्क्यांचा स्लॅब ५ टक्क्यांवर आणल्याने आता खाद्यपदार्थ, किराणा साहित्य, इलेक्ट्राॅनिक्स वस्तूपर्यंत जीएसटी कमी झाली आहे.
येत्या २२ सप्टेंबरपासून याची अमलबजावणी होणार आहे. जीएसटी कमी झाल्यानंतर खाद्यपदार्थ असो की, संबंधित वस्तू याचे दर कमी होणार आहेत, त्यामुळे केंद्र सरकारच्या जीएसटी धोरणात एलपीची गॅसच्या किमती कमी होणार का, हा सवाल ग्राहकांचा आहे. सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतींवर याचा काही परिणाम होईल का?
घरगुती एलपीजी सिलेंडर (१४.२ किलो) आणि व्यावसायिक एलपीजी सिलेंडर (१९ किलो) यांच्यावर वेगवेगळे जीएसटी दर लागू होतात. नवीन दर लागू होण्यापूर्वी, घरगुती सिलेंडरवर ५टक्के GST लागत होता, तर व्यावसायिक सिलेंडरवर १८ टक्के GST लागत होता. नवीन दर लागू झाल्यानंतरही हेच दर कायम राहणार आहेत.