- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होणार असल्याचे संकेत मिळाल्यानंतर सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एक मोठी घोषणा केली आहे.
- पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी जाहीर केले की, मुंबई वगळता राज्यातील इतर सर्व महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राष्ट्रवादी स्वबळावर लढणार आहे.
- नागपूर येथे सुरू असलेल्या पक्षाच्या शिबिरात त्यांनी ही घोषणा केली आहे. पक्ष वाढीसाठी आणि नव्या कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, स्थानिक स्तरावर गरज पडल्यास नेते महायुतीचा निर्णय घेऊ शकतात, पण पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाद्वारे ‘महायुती’ म्हणून लढण्याचे आदेश दिले जाणार नाहीत, असेही पटेल यांनी स्पष्ट केले.
ब्रेकिंग! अजितदादा गटाकडून राजकीय बॉम्ब
