पुण्यातील आयुष कोमकर हत्या प्रकरणात आरोपी असलेल्या आंदेकर कुटुंबाच्या अडचणींमध्ये आता आणखीनच वाढ झाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी अनेक कठोर पावले उचलली आहेत.
आयुष हत्या प्रकरणात आरोपी सोनाली आंदेकर हिला ताब्यात घेण्यासाठी पोलीस गेले असता, काही लोकांनी पोलिसांच्या सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला.
या प्रकरणी पोलिसांनी सोनालीसह १२ जणांविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे. दुसरीकडे, पोलीस तपासात असे समोर आले की, तुरुंगात असूनही आंदेकर टोळीचा प्रमुख बंडू आंदेकर याच्या नावावर जुगार अड्डा सुरू होता.
पोलिसांनी या जुगार अड्ड्यावर छापा टाकून सात जणांवर कारवाई केली आहे. याशिवाय, पोलिसांनी आंदेकर कुटुंबाची आर्थिक नाकेबंदी केली असून, बंडू आंदेकर, वनराज आंदेकर आणि त्यांच्या पत्नींची सगळी बँक खाती, बँक लॉकर सील केले आहेत. गुन्ह्यातील आरोपींना आर्थिक मदत मिळू नये, यासाठी पोलिसांनी हे पाऊल उचलले आहे.