खेळ

माज काही कमी होत नाही, पाक कर्णधाराच्या डोक्यात गेली हवा

  1. आशिया चषकात हस्तांदोलन नाट्याचे पडसाद अजूनही उमटत असताना दोन्ही संघ पुन्हा एकदा सुपर फोरचा सामना खेळण्यासाठी सज्ज होत आहेत. येत्या २१ तारखेला हा सामना होणार आहे. युएई विरुद्धचा सामना जिंकून पाकिस्ताननेही सुपर फोरमध्ये प्रवेश केला आहे. युएई विरुद्धच्या सामन्यात सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांच्यावरून बराच गोंधळ झाल्यानंतर आता पाकिस्ताननेही स्पर्धेवर लक्ष केंद्रीत करण्याचे ठरवले आहे. टीम इंडियाविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यासाठी आम्ही तयार आहोत, असे पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगाने म्हटले आहे.
  2. आता फॉरमॅटप्रमाणे सुपर फोरचे चारही संघ एकेकदा एकमेकांशी खेळणार आहेत. त्यानुसार ए गटातील पहिल्या दोन संघांमधील लढत म्हणजे टीम इंडिया आणि पाकिस्तान दरम्यानची सुपर फोर लढत २१ सप्टेंबरला होणार आहे. मागच्या चार महिन्यात जे क्रिकेट आम्ही खेळतोय, ते जरी रविवारी खेळलो, तरी आम्ही कुठल्याही संघाला हरवू शकतो, असे हास्यास्पद विधान आगाने केले आहे.
  3. प्रत्यक्षात युएई विरुद्धही पाकिस्तानची दमछाक झाली होती. त्यांचे ९ गडी १२८ धावांत बाद झाले होते. दरम्यान, भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने पाकिस्तानविरुद्धच्या कुठल्याही सामन्यात हस्तांदोलन न करण्याची भारताची भूमिका कायमच राहणार, असे म्हटले आहे.

Related Articles

Back to top button