लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना आता ई-केवायसी करणे सरकारने अनिवार्य केले आहे. महिला आणि बाल कल्याण विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी ट्वीट करुन महत्त्वाची माहिती दिली आहे. या योजनेतील सर्व लाभार्थी भगिनींना ई-केवायसी करावी लागणार आहे.
ई-केवायसी प्रोसेस कशी करायची?
तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने ई-केवायसी करायची आहे. यासाठी काही कागदपत्रे, महत्त्वाची माहिती पुन्हा अपलोड करावी लागेल.
तुम्ही https://ladakibahin.maharashtra.gov.in/ वर जाऊन केवायसी करु शकतात. केवायसीमध्ये जाऊन तुम्हाला सर्व कागदपत्रे आणि माहिती टाकायची आहे. तुमचे नाव, पत्ता, रेशन कार्ड, उत्पन्नाची माहिती, आधार कार्ड याची माहिती टाकायची आहे. त्यानंतर तुमची प्रोसेस पूर्ण होईल.
सध्या तरी वेबसाइटवर प्रोसेस सुरु झालेली दिसत नाही. मात्र, लवकरच ही प्रोसेस सुरु होईल आणि केवायसी कशी करायची याबाबत माहिती दिली जाईल.