सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील अकरा मतदारसंघातील मतदानाची अंतिम टक्केवारी किती?
सोलापूर जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघात दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी झालेल्या मतदानाची अंतिम टक्केवारी 67.72 टक्के इतकी आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 20 नोव्हेंबर 2024 रोजी सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात मतदान घेण्यात आले. जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघात एकूण 67.72 टक्के मतदान झालेले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.