राजकीय

पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार फॅक्टर?

  1. राज्यात विधानसभा मतदारसंघासाठी काल मतदान पार पडले. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या अंदाजित आकडेवारीनुसार राज्यात 65.02 टक्के इतके मतदान झाले. 2019 च्या निवडणुकीच्या तुलनेत हे मतदान काही टक्क्यांनी जास्त झाले आहे. त्यामुळे आता राज्यात कोणाची सत्ता येणार हे 23 तारखेला पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील मतदार कुणाच्या पाठिशी उभा आहे याचाही ढोबळ अंदाज मांडला आहे. पश्चिम महाराष्ट्रातही महाविकास आघाडीचाच दबदबा राहिल असा अंदाज दिसत आहे.
  2. पश्चिम महाराष्ट्रात जवळपास 70 विधानसभा मतदारसंघ येतात. या मतदारसंघातील 40 ते 42 जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होऊ शकतात, असा अंदाज हैदराबाद स्थित एसएएस ग्रुपने वर्तवला आहे. तर महायुतीला फक्त 27 ते 28 जागा मिळतील, अशी शक्यता आहे. दैनिक भास्कर हिंदी वृत्तपत्राचाही अंदाज महायुतीला धडकी भरवणाराच आहे.
  3. दैनिक भास्करने महाविकास आघाडीला 135 ते 150 जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त केला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी फाईट म्हणजे बारामती विधानसभा मतदारसंघ. बारामतीत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी ‘काका-पुतण्यांची थेट लढत झाली. तर मावळमध्ये सुनिल शेळके विरुद्ध बापू भेगडे अशी थेट लढत झाली. यानंतर सगळ्यात हाय व्हॉल्टेज लढत कोल्हापूर जिल्ह्यातील कागल विधानसभा मतदारसंघातली होती. दोन कट्टर विरोधक, राष्ट्रवादी अजित पवार गटातून हसन मुश्रीफ आणि शरद पवारांच्या पक्षाकडून समरजीत घाटगे आमनेसामने आहेत. या मतदारसंघात 81 टक्क्यांहून अधिक मतदान झाले आहे. त्यामुळे या मतदारसंघात कोण बाजी मारणार, याची उत्सुकता आहे.
  4. झी 24 तासच्या एआय (आर्टिफिशीयल इंटेलिजन्स) एक्झिट पोलनुसार पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार फॅक्टर पहायला मिळू शकतो. पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडी मुसंडी मारू शकते असा अंदाजे झीनियाने व्यक्त केला आहे. पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडीला 37 ते 42 जागा मिळू शकतात. तर महायुतीला 28 ते 33 जागा मिळण्याचा अंदाज आहे.
  5. पुणे जिल्ह्यातील एकूण 21 जागांपैकी 11 जागा महाविकास आघाडीला तर 10 जागा महायुतीला मिळण्याचा अंदाज बहुतेक एक्झिट पोल्सने व्यक्त केला आहे.

Related Articles

Back to top button