राजकीय
ब्रेकिंग! मतदान संपताच भाजपने ग्राऊंड लेव्हलवरुन माहिती मागवली

- राज्यात विधानसभा मतदारसंघासाठी काल मतदान पार पडले. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या अंदाजित आकडेवारीनुसार राज्यात 65.02 टक्के इतके मतदान झाले. 2019 च्या निवडणुकीच्या तुलनेत हे मतदान काही टक्क्यांनी जास्त झाले आहे. त्यामुळे आता राज्यात कोणाची सत्ता येणार हे 23 तारखेला पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
- आता विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा एक्झिट पोल समोर आला. राज्यात सत्तेच्या खुर्चीत कोण बसणार? याबाबतचे अंदाज वर्तवण्यात येत आहेत. यासंदर्भात विधानसभेचे मतदान झाल्यानंतर भाजपने अंतर्गत सर्व्हे जाहीर केला आहे. महायुतीची सत्ता येणार असा दावा भाजपच्या बूथ लेवल्ह सर्व्हेने केला आहे. महायुतीला 164 जागा, महाविकास आघाडीला शंभर तर इतर पक्षांना 24 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला गेला आहे. महायुतीमध्ये शंभर जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरण्याचा अंदाज या सर्व्हेने वर्तवला आहे.
- दरम्यान एक्झिट पोलच्या अंदाजानुसार राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये अटीतटीची लढत झाली. मात्र, महायुतीचं पारडे काहीसे जड असल्याचे बोलले जात आहे.



